कोलेटीजवळ धुरळ्याची आंघोळ

कोलेटीजवळ धुरळ्याची आंघोळ
Published on: 

कोलेटीजवळ वाहनांच्या वर्दळीमुळे धुरळा
उड्डाणपुलाचे काम रखडल्याने प्रवासी त्रस्त
पाली, ता. २ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी गावाजवळ उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्याने कोकणच्या दिशेने जाणारी वाहतूक बाजूच्या तात्पुरत्या सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. दरम्यान, या रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली असून, वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धुरळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडले असून, पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. कोलेटीजवळ धुळीचे लोट हवेत पसरल्याने काही वेळा रस्ता अस्पष्ट होतो. त्यामुळे समोरील वाहन न दिसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना धुळीमुळे डोळे आणि श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागोठणे येथील कामथ गोविंदा हॉटेलजवळील उड्डाणपुलाचीही अशीच स्थिती आहे. हा पूल एका बाजूने वाहतुकीसाठी बंद असल्याने कोकणकडे जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

धुळीमुळे अपघाताचा धोका
कोलेटीजवळ वाहनांची वर्दळ सुरू असताना उडणारी धूळ काही क्षणांत रस्त्यावर दाट पडदा निर्माण करते. त्यामुळे चालकांना समोरील वाहनाचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ मोहन भोईर यांनी उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करून धुळीचा त्रास दूर करण्याची मागणी केली.


फोटो ओळ, पाली : कोलेटीजवळ रस्त्यावर उडणारा धुरळा. (छायाचित्र : अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com