

गावरान भाज्यांची आवक वाढली
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः वातावरणातील बदल आणि पावसाची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने पुणे व नवी मुंबईतून येणाऱ्या भाजीपाल्याच्या भावामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत, मात्र या महागड्या भाजीपाल्याला सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी पिकवलेल्या सेंद्रिय गावरान भाज्यांचा स्वस्त, पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या स्थानिक बाजारात या गावरान भाज्यांची प्रचंड आवक वाढली आहे.
आदिवासी बांधव व स्थानिक शेतकरी डोंगर-उतारावर, रानमाळावर आणि घराच्या परसात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता या भाज्या पिकवतात आणि आदिवासी महिला बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. बाजारात सध्या शिराळे, घोसाळे, कारली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, गवार आणि ठाकरी मिरची मुबलक प्रमाणात दाखल झाली आहे. अवघ्या १५ ते २० रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो अशा परवडणाऱ्या भावात या भाज्या मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे.
‘ठाकरी मिरची’ची खास भुरळ
या सर्व गावरान भाज्यांमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेली ‘ठाकरी मिरची’ (ज्याला बुटकी किंवा ठेंगू मिरचीही म्हणतात) विशेष आकर्षण ठरत आहे. अतिशय तिखट आणि चविष्ट असलेली ही ठाकरी मिरची तेलात तळून, हळद-मीठ लावून वाळवून किंवा तिचे लोणचे करून खाल्ली जाते. या मिरचीचा ठेचा अथवा चटणी जेवणाची चव वाढवणारी ठरते.
गावरान भाज्या पौष्टिक व सेंद्रिय असल्याने अत्यंत आरोग्यदायी आहेत. विशेषतः ठाकरी मिरची या पारंपारिक वाणाला पेटंट मिळायला हवे. आदिवासी व ठाकूर बांधवांना योग्य हमीभाव, हक्काची बाजारपेठ आणि शास्त्रीय मार्गदर्शन मिळाल्यास, इतर हंगामांतही उत्पादन घेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावता येईल.
- राजू बांगारे, शिक्षक, सुधागड
फोटो ओळ, पाली, विक्रीसाठी आलेल्या गावरान भाज्या. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, विक्रीसाठी आलेली वैशिष्टयपूर्ण ठाकरी मिरची. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, राजू बांगारे, शिक्षक, सुधागड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.