पालीत सामाजिक उपक्रमांचा जागर

पालीत सामाजिक उपक्रमांचा जागर
Published on: 

पालीत सामाजिक उपक्रमांचा जागर
गरजूंना मदत, आरोग्यसेवा आणि पर्यावरण संवर्धनासाठी नगर पंचायतीचा पुढाकार
पाली, ता. ११ (वार्ताहर) : सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागृतीच्या उद्देशाने पाली नगर पंचायतीतर्फे शनिवारी (ता. १०) ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विविध उपक्रम राबविण्यात आले. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने सतरंजी-बैठक वाटप, दिव्यांगांना आर्थिक मदत, गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
नगर पंचायतीच्या २०२५-२६ मधील पाच टक्के राखीव निधीतून दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना सतरंजी व बैठकीचे वाटप करण्यात आले. विशेष दिव्यांग निधीतून पात्र दिव्यांगांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
‘पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ मध्ये राजेंद्र दत्तात्रय अबिके यांनी प्रथम क्रमांक मिळवला. प्रथमेश गणेश उपाध्ये आणि सुरेश यशवंत बेलोसे यांना विभागून द्वितीय, तर अभिजित नथुराम शिंदे आणि सागर प्रसाद खंडागळे यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळाला. करण कैलास कदम आणि सदाशिव प्रल्हाद जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मोफत नेत्रतपासणी शिबिरालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांची उपस्थिती
नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, मुख्याधिकारी किशोर जेठे, नगरसेवक आरिफ मणियार, सुधीर भालेराव, जिगीशा खोडागळे, जुईली ठोंबरे, कल्याणी दपके, स्वप्नाली जाधव, सुनंदा पाटील, प्रशासकीय अधिकारी सोनल शिंदे आणि अमोल बायकर यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ, पाली, विविध साहित्य वाटप करताना नगर पंचायत नगर अध्यक्ष व पदाधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com