ढोकशेत धरणात एक तरूण बुडाला शोधमोहीम सुरू अंडरवॉटर ड्रोन''ची गरज पुन्हा अधोरेखित

ढोकशेत धरणात एक तरूण बुडाला  शोधमोहीम सुरू अंडरवॉटर ड्रोन''ची गरज पुन्हा अधोरेखित
Published on: 

ढोकशेत धरणात तरुण बुडाला

पाली, ता. ११ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथील धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेले दहीगाव येथील रहिवासी दत्तू गौरू वाघमारे (वय ४४) रविवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची दुर्घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून, तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

ढोकशेत येथील धरणामध्ये एका लहान मुलाने वाघमारे यांना पाण्यात बुडताना पाहिले होते. घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांचे पथक, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे जीवरक्षक आणि पालीतील आपदा मित्र यांनी तातडीने ढोकशेत धरण गाठले. प्रशासकीय यंत्रणा आणि आपदा मित्रांच्या सहकार्याने धरण पात्रात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. शोधमोहिमेदरम्यान पाण्याची खोली अंदाजे १२० ते १३० फूट असल्याचे निदर्शनास आले.
-----------------
अंडरवॉटर ड्रोनची गरज
रायगड जिल्ह्यात नद्या, तलाव आणि धरणांमध्ये बुडण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा परिस्थितीत शोधमोहीम अधिक जलद, प्रभावी आणि रेस्क्यू टीमच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन राबवण्यासाठी आधुनिक अंडरवॉटर ड्रोन या उपकरणाची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याच अनुषंगाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेमार्फत गेल्या पाच महिन्यांपासून रायगड जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर फाटक यांच्याकडे अंडरवॉटर ड्रोन उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून हे उपकरण लवकरात लवकर पुरवले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com