सुधागडात दुष्काळ निवारणाची मागणी

सुधागडात दुष्काळ निवारणाची मागणी
Published on: 

सुधागडात दुष्काळ निवारणाची मागणी
सात दिवसांत आराखडा जाहीर करा
पाली, ता. २६ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि गोपालकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, तसेच तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. २६) तालुका कृषी अधिकारी, पाली-सुधागड यांना निवेदन देऊन सात दिवसांत सविस्तर कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी भाजप किसान मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित बारसकर, जिल्हा चिटणीस शशिकांत पाशिलकर, सदस्य दिनेश बुरुमकर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पडवळ उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठ स्तरावर शासनाकडे सादर करावा आणि दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच ठिबक आणि तुषार सिंचनाला प्रोत्साहन द्यावे. पाणीटंचाईग्रस्त भागांत टँकर व पंपांची व्यवस्था सज्ज ठेवावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना
गोपालकांना पशुधन विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी चारा पिकांचे नियोजन, चारा साठा आणि सवलतीच्या दरात पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबवावी. कृषी विभागाने सात दिवसांत कृती आराखडा जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी मोर्चाने केली.

फोटो ओळ : पाली येथे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य. (छायाचित्र : अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com