विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंग

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंग
Published on: 

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंग
तीन आश्रमशाळांतील ८५० विद्यार्थ्यांचा सहभाग; पणत्या, आकाशकंदिलांची निर्मिती
पाली, ता. ६ (वार्ताहर) : ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक उपक्रम संशोधिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘विकास मित्र प्रकल्पा’अंतर्गत सुधागड तालुक्यातील चिवे, वावळोली आणि पडसरे येथील आश्रमशाळांमध्ये दिवाळीनिमित्त पणती रंगकाम व आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात तीनही शाळांतील सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
एएफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मुंबई आणि शापूरजी पल्लोनजी ग्रुप यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध रंग आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक पणत्या रंगविल्या, तसेच स्वतःच्या कल्पकतेतून आकाशकंदील तयार केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘सुबोध छात्र प्रबोधन’ या नियतकालिकाच्या दिवाळी विशेषांकाचेही तीनही शाळांमध्ये प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विशेषांक भेट देण्यात आला.
या उपक्रमासाठी प्राचार्य गणेश महाडिक, दिनेश इंगळे, सुनीता पिंगळे, जयवंत गुरव, संदीप शिंदे, मिनाक्षी ढोपे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
तीन आश्रमशाळांतील ८५० विद्यार्थ्यांचा सहभाग; पणत्या, आकाशकंदिलांची निर्मिती
पाली, ता. ६ (वार्ताहर) : ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक उपक्रम संशोधिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘विकास मित्र प्रकल्पा’अंतर्गत सुधागड तालुक्यातील चिवे, वावळोली आणि पडसरे येथील आश्रमशाळांमध्ये दिवाळीनिमित्त पणती रंगकाम व आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात तीनही शाळांतील सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
एएफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मुंबई आणि शापूरजी पल्लोनजी ग्रुप यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध रंग आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक पणत्या रंगविल्या, तसेच स्वतःच्या कल्पकतेतून आकाशकंदील तयार केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘सुबोध छात्र प्रबोधन’ या नियतकालिकाच्या दिवाळी विशेषांकाचेही तीनही शाळांमध्ये प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विशेषांक भेट देण्यात आला.
या उपक्रमासाठी प्राचार्य गणेश महाडिक, दिनेश इंगळे, सुनीता पिंगळे, जयवंत गुरव, संदीप शिंदे, मिनाक्षी ढोपे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.म

फोटो ओळ : पाली : आश्रमशाळांतील पणती रंगकाम व आकाशकंदील कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक. (छायाचित्र : अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, आश्रमशाळांमध्ये पणती रंगकाम व आकाशकंदील कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी व शिक्षक व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.