

चाफेवाडी आदिवासी पाड्यात रस्त्याची दुरवस्था
पालिका प्रशासनाकडे दुर्लक्ष, ग्रामस्थ्यांचा आरोप
खारघर, ता. ८ (बातमीदार) : येथील टेकडी परिसरातील चाफेवाडी आदिवासी पाड्यातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाड्यातील मुख्य मार्गावर बसवलेले पेव्हर ब्लॉक निखळले असून, अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. पालिका प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चाफेवाडी पाड्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे, मात्र रस्त्यावरील ब्लॉक निखळल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. पावसात त्यामध्ये पाणी साचून तेथून मार्गक्रमण करताना घाण पाणी अंगावर उडत आहे. तसेच, यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाड्यातील रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच स्वच्छता, पाणी निचरा आणि मूलभूत नागरी सुविधांबाबतही समस्या असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासनाकडे वारंवार समस्या मांडूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
चाफेवाडी आदिवासी पाड्यातील रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच पाड्यातील इतर नागरी समस्यांचेही कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.