

खारघरमधील नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी
काही मोजक्याच प्रभागांत विकास निधीची खैरात, वरिष्ठांच्या हस्तक्षेपाची मागणी
खारघर, ता. ७ (बातमीदार) : खारघरमधील विकासकामांच्या निधी वाटपात आणि मंजुरीमध्ये पालिका प्रशासनाकडून मोठा दुजाभाव केला जात असल्याचा दावा काही नगरसेवकांनी केला आहे. मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या प्रभागांतील प्रस्तावांना तातडीने हिरवा कंदील दाखवला जात असून, उर्वरित नगरसेवकांच्या निधीला ब्रेक लावण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
खारघरमधील प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ मध्ये भाजपचे १०, तर ठाकरे गटाचे दोन असे एकूण १२ नगरसेवक व नगरसेविका प्रतिनिधित्व करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निधीवाटप आणि कामांच्या मंजुरीमध्ये ठरावीक प्रभागांच प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, पथदिवे आणि उद्यानांचे सुशोभीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांची मंजुरी अडकल्यामुळे रहिवाशांकडून नगरसेवकांवर प्रश्नांचा भडीमार होत आहे. या प्रकारावर काही नगरसेवकांनी असंतोष व्यक्त केला आहे. आमच्या प्रभागातील विकासकामांना मंजुरी न मिळणे ही सत्य परिस्थिती आहे. विकासकामे कोणत्याही एका पक्षाची किंवा ठरावीक नगरसेवकापुरती मर्यादित नसून, सर्व नागरिकांच्या सोयीसाठी असतात, असे मत काही नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. सर्व १२ नगरसेवकांच्या प्रभागात समान निधी आणि विकासकामांना तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व प्रशासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.