डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ

डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ
Published on

डेंगी रुग्णसंख्येत वाढ
ऑगस्टपर्यंत २९८ रुग्ण; डास नियंत्रणासाठी पालिकेची विशेष मोहीम
खारघर, ता. १६ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सर्वेक्षण मोहीम तीव्र केली आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत डेंगीचे ३,७२५ रक्त नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी २९८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या वर्षभरात २११ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा ऑगस्टपर्यंतच गतवर्षीच्या तुलनेत अधिक रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्यातील बदलते हवामान आणि डासांची उत्पत्ती यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात मलेरियाच्या रुग्णांचीही नोंद होत आहे. २०२४ मध्ये १,०८,४२९ मलेरिया स्लाईड तपासण्यात आल्या असून, ९२६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. २०२५ मध्ये १,३२,५६३ स्लाईड तपासून १,०६५ रुग्ण आढळले. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत १,०१,८३० स्लाईड तपासण्यात आल्या असून, ४८० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. डेंगीचे २०२४ मध्ये २९४, तर २०२५ मध्ये २११ रुग्ण आढळले होते.
महापालिकेच्या प्रयोगशाळेत तसेच नागरी आरोग्य केंद्रांमध्ये डेंगी तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. मलेरियासाठी पीएस फॉर एमपी आणि एमपी अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य सेविका व आरोग्य निरीक्षक खासगी रुग्णालयांना भेटी देऊन संशयित रुग्णांची माहिती संकलित करत आहेत. रुग्ण आढळलेल्या भागात ताप सर्वेक्षण, धूरफवारणी आणि औषध फवारणी केली जात आहे.

तपासणी शिबिरे
सप्टेंबर महिन्यात महापालिकेने डास नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बांधकामस्थळे तसेच अधिक धोका असलेल्या भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत मलेरिया तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. नागरिकांमध्ये डेंगी आणि मलेरिया प्रतिबंधाबाबत जनजागृती केली जात असून, कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्याचेही नियोजन आहे.

नागरिकांच्या सहभागावर भर
कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराभोवती पाणी साचू न देणे आणि डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. डेंगी, मलेरिया तसेच स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्याचेही नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com