खारघरमध्ये राजकीय समीकरणांत रंगणार नवरात्रोत्सव! चार ठिकाणी भव्य आयोजने; दांडिया, गरबा आणि नामवंत गायकांच्या साथीने सांस्कृतिक मेजवानी

खारघरमध्ये राजकीय समीकरणांत रंगणार नवरात्रोत्सव! चार ठिकाणी भव्य आयोजने; दांडिया, गरबा आणि नामवंत गायकांच्या साथीने सांस्कृतिक मेजवानी
Published on: 

खारघरमध्ये राजकीय समीकरणांत रंगणार नवरात्रोत्सव!
चार ठिकाणी भव्य आयोजने; दांडिया, गरबा आणि नामवंत गायकांच्या साथीने सांस्कृतिक मेजवानी
खारघर ता . १२ (बातमीदार) : खारघरमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवाला राजकीय समीकरणांची झालर लाभली असून, गरबा आणि दांडियाप्रेमींसाठी चार प्रमुख ठिकाणी पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक गरब्याच्या तालासोबत आधुनिक संगीत, गायक आणि आकर्षक बक्षिसांमुळे यंदा खारघरमधील तरुणाईसाठी मनोरंजनाची मोठी पर्वणी ठरणार आहे.
कॉलनी फोरमच्या माध्यमातून उत्सव चौकाजवळील मैदानात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. या वेळी लीना गरड आणि भाजप कार्यकर्ते अमर उपाध्याय यांचा पुढाकार असायचा, मात्र राजकीय घडामोडींनंतर लीना गरड यांनी भाजपपासून फारकत घेत अमर उपाध्याय, माजी नगरसेवक नरेश ठाकूर आणि कीर्ती नवघरे यांनी लिटिल वर्ल्ड मॉलसमोरील वाहनतळावर स्वतंत्र नवरात्रोत्सव सुरू केला होता. पुढे बांधकाम व्यावसायिक मधु पाटील यांनी कॉलनी फोरममध्ये सहभाग घेतल्याने उत्सव चौकातील कार्यक्रम सुरूच राहिला. यंदा भाजपच्या तिकिटावर मधु पाटील नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने भाजपप्रणीत मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डी-मार्टसमोरील जेएचबीसी मैदानात खारघरची आई-नमो गरबा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, भाजपमधील स्थानिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कीर्ती नवघरे यांच्या वतीने लिटिल वर्ल्ड मॉलसमोरील वाहनतळावर ‘लोटस गरबा महोत्सव’ रंगणार आहे. तर अमर उपाध्याय आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने सेक्टर सात हिरानंदानी इमारती मागील खेळाच्या मैदानात खारघर जल्लोष स्वतंत्र गरबा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com