अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू *प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन*

अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू  *प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन*
Published on: 

सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू
प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
खारघर, ता. २ (बातमीदार) ः राज्य शासनाच्या निर्णयानुसार पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याच्या अनुषंगाने सिडको प्रशासनानेही उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भविष्यात उद्भवणारी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार सिडको कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून, प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार (ता. २)पासून पाणीकपात लागू केली आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील सर्व नागरिकांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा आणि या नियोजनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतेपुरता करावा. वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घरातील तसेच गृहनिर्माण संकुलातील पाण्याच्या साठवण टाक्या भरून वाहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. घरातील नळ अथवा जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. आवश्यकता नसताना नळ सुरू ठेवू नयेत. घरामध्ये साठवून ठेवलेले पाणी केवळ शिळे झाले आहे, या समजुतीने फेकून देऊ नये. तसेच शहरातील जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिडको प्रशासनाने दिला आहे.


नोडनिहाय पाणीकपातीचे वेळापत्रक :
सोमवार : खारघर आणि नवीन पनवेल (पूर्व)
मंगळवार : नवीन पनवेल (पश्चिम) तसेच उलवे सेक्टर २, ३, ५, ६, १९, २०, २२, २३, २४, २५, २५-अ आणि गव्हाण, कोपर व मोरावे.
बुधवार : कळंबोली
गुरुवार : करंजाडे
शुक्रवार : तळोजा, कळुंद्रे आणि कामोठे

एक दिवसाआड पाणीपुरवठा असणारे परिसर :
उलवे व न्हावा परिसर : उलवे सेक्टर ८, ९, १०-ब, १५-क, १६, १७, १८ तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर व न्हावा खाडी.
द्रोणागिरी व लगतची गावे : द्रोणागिरी सेक्टर १, २, ११, १२, १५, ३०, ४७, ४८, ५० ते ५५ तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकरडवीरा व कुंडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.