फटाक्यांच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ; खारघरमध्ये रंगीत आणि इकोफ्रेंडली फटाक्यांना पसंती खारघरमध्ये ६४ फटाक्यांची दुकाने सजली; कमी धूर करणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ

फटाक्यांच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ; खारघरमध्ये रंगीत आणि इकोफ्रेंडली फटाक्यांना पसंती खारघरमध्ये ६४ फटाक्यांची दुकाने सजली; कमी धूर करणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ
Published on: 

पर्यावरणपूरक फटाक्यांना पसंती
कमी धूर करणाऱ्या मागणीत वाढ
खारघर, ता. ३ (बातमीदार) : दिवाळीनिमित्त फटाक्यांची दुकाने सजली असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, मात्र यंदाच्या दिवाळीत पारंपरिक फटाक्यांपेक्षा आकाशात रंगीबेरंगी रोषणाई करणारे, कमी आवाजाचे आणि कमी धूर निर्माण करणारे इकोफ्रेंडली फटाके खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.
नागरिकांंमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत असल्याने हवा आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने अनेक कुटुंबे कमी धूर करणाऱ्या फटाक्यांना पसंती देत आहेत. विशेषतः आकाशात विविध रंगांची आकर्षक उधळण करणारे फटाके, रंगीत अनार, फुलबाज्या आणि कमी आवाजाचे फटाके यांना ग्राहकांकडून मागणी मिळत आहे. लहान मुलांसाठी फुलबाज्या, भुईचक्र, अनार यांसारख्या फटाक्यांना पसंती दिली जात असून, तरुणांमध्ये आकाशात रंगीत रोषणाई करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण कायम आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक पर्यायांची उपलब्धता वाढविण्यात आली आहे.

दरात १५ टक्क्यांनी वाढ
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खारघर परिसरात फटाके खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा फटाक्यांच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चातील वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढल्याचा थेट परिणाम फटाक्यांच्या किरकोळ विक्री दरावर झाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मागील तीन वर्षी फटाक्याच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती, मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण आणि अफगाणिस्तान परिसरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे फटाके निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या तसेच विशिष्ट पावडरच्या आयातीवर परिणाम झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतुकीची खर्च वाढल्याने या वर्षी जवळपास १५ टक्के दरात वाढ झाली आहे.
- आदेश भोईर, फटाकेविक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.