खारघरवासीयांनी फोडले दीड कोटींचे फटाके! दिवाळीत आतषबाजीचा उत्साह; फटाक्यांच्या खरेदी-विक्रीत कोट्यवधींची उलाढाल

खारघरवासीयांनी फोडले दीड कोटींचे फटाके! दिवाळीत आतषबाजीचा उत्साह; फटाक्यांच्या खरेदी-विक्रीत  कोट्यवधींची उलाढाल
Published on: 

खारघरमध्ये फटाक्यांची कोट्यवधींची उलाढाल
दिवाळीत आतषबाजीचा उत्साह
खारघर, ता. १२ (बातमीदार) : दिवाळी म्हटली की दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण ठरलेले असते. यंदाच्या दिवाळीत खारघर परिसरात यंदा अंदाजे दीड कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, यामुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खारघर सेक्टर १५ डी मार्ट समोरील मैदानात ४९ तर उत्सव चौकात १५ या शिवाय काही दुकानात छुप्या पद्दतीने फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये फटाके खरेदी करण्याचा उत्साह दिसून आला. यंदा विविध प्रकारचे फटाके, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी फुलबाज्या, अनार, चक्री, रॉकेट आणि शोभेच्या आतषबाजीच्या साहित्याला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसेच दिवाळीच्या मुख्य सणाला सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक सोसायट्या, गृहनिर्माण संकुले आणि मोकळ्या मैदानांच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दिवाळीनंतर काही भागांत फटाक्यांचा कचरा आणि धूर दिसून आला. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासोबतच सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

खारघरमधील प्रत्येक फटाकाविक्रेत्याने साधारण दोन ते अडीच लाखांचे फटाके खरेदी केले होते. या वर्षी फटाक्यांच्या दरात १५ टक्के वाढ झाली होती, असे असले तरी व्यवसाय चांगला झाला आणि बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळाली
- आदेश भोईर, फटाकाविक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.