Wed, March 29, 2023

गगनगिरी मठात रंगला ‘शब्दांचा दरबार’
गगनगिरी मठात रंगला ‘शब्दांचा दरबार’
Published on : 7 February 2023, 12:08 pm
खोपोली, ता.७ (बातमीदार) ः कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली शाखा व साहित्य कला मंच पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यसंमेलनात शब्दांचा सुंदर दरबार भरला होता. खोपोलीतील कोमसापचे सदस्य बाबू डिसूझा यांचे सूचनेनुसार गगनगिरी महाराज मठात कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी कोमसापचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा बाल विभाग प्रमुख प्रकाश राजोपाध्ये, रायगड जिल्हा कोषाध्यक्ष रेखा कोरे, बालविभाग सल्लागार अण्णासाहेब कोरे, नरेंद्र हर्डीकर, निशा दळवी आदींनी सहभाग घेतला. राजोपाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड कोमसाप कोषाध्यक्षा रेखा कोरे होत्या. सर्व कवींनी शब्दांची उधळण करीत वातावरण आनंदाचे रंग भरले.