खोपोलीत भरगच्च कार्यक्रम

खोपोलीत भरगच्च कार्यक्रम

खोपोली, ता. १० (बातमीदार)ः खोपोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्‍सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंगळवार (ता.११) महात्मा ज्‍योतिबा फुले जयंतीदिनापासून १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शुक्रवारी डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात विविध कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी भव्य मिरवणूक तर १५ एप्रिलला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुख्य कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com