मावळचे अंदाज बांधले , विजयाचे तोरण बांधण्यासाठी मतमोजणीची प्रतिक्षा

मावळचे अंदाज बांधले , विजयाचे तोरण बांधण्यासाठी मतमोजणीची प्रतिक्षा

आम्‍हीच बांधणार विजयाचे तोरण
मावळमध्ये दोन्ही उमेदवारांना विश्‍वास; मतमोजणीची प्रतीक्षा

खोपोली, ता. १ (बातमीदार)ः मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान झाले. जिल्‍ह्यात जवळपास ५४ टक्के मतदान झाले असून महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यात अटीतटीची लढाई आहे. दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला असून चार जूनला मतमोजणीनंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. विजयाचा विश्‍वास असल्‍याने ठिकठिकाणी इंडिया आघाडी कडून विजयी मिरवणुकांची ही जोरदार तयारी करण्यात येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड होते. बारणे ही निवडणूक सहज जिंकतील,अशा प्रकारे वातावरण असल्याने महायुतीचे कार्यकर्ते व नेते निश्चित होते. मात्र निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रचारात आघाडी मिळवल्‍याचे दिसले. त्यात शिवसेना (ठाकरे गट)-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) आणि शेकाप -आपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रचार यंत्रणा उभी केली आणि युतीचे उमेदवार बारणे यांच्यासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यात मराठा समाज, दलित - मुस्लिम व अन्य अल्पसंख्याक मतदारांनी मोठ्या प्रमाणावर इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे बोलले जात असल्‍याने मावळमध्ये गड राखण्यासाठी बारणे आणि वाघेरेंमध्ये अटीतटीची लढाई निर्माण झाली आहे. दरम्यान बारणे यांनी व त्यांचे समर्थक आमदारांनी कमीत कमी एक ते सव्वा लाखाच्या फरकाने विजयी होणार असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे उमेदवारांबरोबरच मतदारांनाही निकालाची उत्‍सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com