डम्‍पिंग ग्राउंडविरोधात लव्हेज ग्रामस्‍थ आक्रमक

डम्‍पिंग ग्राउंडविरोधात लव्हेज ग्रामस्‍थ आक्रमक
Published on

खोपोली, ता. ४ (बातमीदार) ः नगरपालिकेच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक एकमध्ये डम्पिंग ग्राउंडसाठी २० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे, मात्र डम्‍पिंग ग्राउंडला लव्हेज व परिसरातील नागरिक विरोध करीत आहेत. याप्रकरणी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत घेतला.
२५ वर्षांहून अधिक काळ हरित पट्टा असलेल्‍या या भागातील आरक्षण प्रशासनाने अलीकडेच उठवले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र नगररचना विभागाने परिसरातील २० एकर जागा डम्‍पिंग ग्राउंडसाठी आरक्षित केल्‍याने लव्हेज व परिसरातील ग्रामस्थांनी याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. खोपोली व परिसरातील जागा झपाट्याने विकसकांकडून संपादित करण्यात आल्या असून, मोठमोठी गृहसंकुले उभी राहात आहेत. परिसरातील कचरा आरक्षित जागेवर टाकला जाणार असल्‍याने भविष्‍यात दुर्गंधी तसेच अस्‍वच्छतेचा त्रास होण्याची शक्‍यता असल्‍याने ग्रामस्‍थांमध्ये नाराजी आहे.
परिसरातील काही जमीन यापूर्वीच एका स्टील कारखान्याला देण्यात आली आहे. डम्‍पिंग ग्राउंडमुळे लव्हेज गावासह सुभाष नगर, वासरंग-श्रीराम नगर, उदय विहार, सरस्वती नगर, चिंचवली-शेडवली त्याचप्रमाणे नवघर ही गावे प्रस्तावित डम्‍पिंग ग्राउंडमुळे बाधित होण्याची शक्यता आहे.

सुनावणीला ग्रामस्‍थ उपस्‍थित राहणार
डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागेल. जवळच शाळा, मंदिरे, व पर्यटनस्थळे असताना प्रशासनाने डम्पिंग ग्राउंडसारखा नियोजित प्रकल्प आणल्‍याने ग्रामस्‍थांमधून संताप व्यक्‍त होत आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रकल्‍पास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लव्हेज ग्रामस्थांचा डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध आहे. यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामसभेत घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सुनावणीदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

खोपोली : डम्पिंग ग्राउंडला विरोध करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com