खोपोलीत पावसाळापूर्व कामांना गती

खोपोलीत पावसाळापूर्व कामांना गती

Published on

खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः आठवडाभरापासून खोपोली नगरपालिकेकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नैसर्गिक नाले व गटारींच्या सफाईला प्राथमिकता देण्यात आल्याचे माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची साफसफाई होणार असून, त्‍याअंतर्गत मोठे नाले व बंदिस्त गटारांतील गाळ, कचरा काढण्यात येणार आहे.
नालेसफाईसाठी स्वच्छता विभागात अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात आले आहे. या वेळी कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत असून, सुरक्षा नियमांचे पालन करून त्या त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाच्या नियंत्रणाखाली कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी आधुनिक साधन सामग्री, जेसीबीची गरज आहे, त्‍या ठिकाणी व्यवस्‍था करण्यात आली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे जोरदार सुरू झाली आहेत. खोपोली शहर हे सह्याद्रीच्या कुशीत असल्याने डोंगर-दऱ्यांतून येणाऱ्या पाण्याचा लोंढा हा मोठ्या प्रमाणात असून, गाळ, कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. त्‍यामुळे नाले तुंबतात. पावसाळ्यात पाण्याचा लवकरात लवकर निचरा व्हावा, यासाठी सध्या नाल्यात साठलेला गाळ व कचरा जेसीबीच्या साह्याने काढण्याचे काम जोरात सुरू आहे.

दररोज कामाचा आढावा
भानवज गाव नाला, वर्धमान विहार नाला, कार्मेल स्कूल तसेच क्रांतीनगर विणानगर आणि मिळगाव येथील नाला येथे नगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिल वाणी, अभियंता सतीश हडप, अविनाश गायकवाड हे भेट देऊन नियोजन करीत आहेत. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांचे या सर्व कामकाजावर नियंत्रण असून, त्यांच्याकडून नालेसफाईच्या कामांचा दररोज आढावा घेतला जात आहे.

खोपोली : शहरात नाले, गटारातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com