टाटा–गोदरेजविरोधातील एल्गार आंदोलनावर शिक्कामोर्तब प्रांताधिकारींकडील समन्वय बैठक निष्फळ;

टाटा–गोदरेजविरोधातील एल्गार आंदोलनावर शिक्कामोर्तब प्रांताधिकारींकडील समन्वय बैठक निष्फळ;
Published on

कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन
टाटा-गोदरेजविरोधात एल्गार; संयुक्त बैठक निष्फळ

कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील टाटा स्टील व गोदरेज कंपन्यांमधील स्थानिकांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे एल्गार आंदोलन अटळ आहे. प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या दालनात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली संयुक्त मध्यस्थी बैठकीत तोडगा निघाला नसल्याने निष्फळ ठरली आहे.
या बैठकीला प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, डीवायएसपी खालापूर विशाल नेहुल, कर्जतचे डीवायएसपी राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक खालापूर, नायब तहसीलदार खालापूर सुधाकर राठोड, टाटा व गोदरेज कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक तसेच आंदोलक सुधाकर घारे व त्यांच्या प्रतिनिधींसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते; मात्र मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्याने आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
सुधाकर घारे यांनी सांगितले, की हे आंदोलन पक्षविरहित व राजकारणविरहित असून २० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसह दोन्ही कंपन्यांच्या गेटवर धडक दिली जाईल. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक व राजकीय पक्षांना पाठिंब्याची पत्रे पाठविण्यात येत असून अनेक संघटनांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे.
------
आंदोलन नेमके कशासाठी?
भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये ८० टक्के रोजगार लागू करावा.
कंत्राटी कामगारांना किमान वेतन व कायदेशीर सुविधा मिळाव्यात.
१० ते १२ हजार रुपयांत होणारे कामगारांचे शोषण थांबवावे.
स्थानिक ठेकेदारीतून आवाज दाबण्याची पद्धत बंद करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com