सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करू
चिपळुणात उभारणार सहकार प्रशिक्षण केंद्र
कोकणात ‘पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग’ उभे राहावेत : दरेकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : कोकण विभागीय सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये स्थापन करू, तुम्हाला जी मशिनरी, यंत्रणा लागेल, ती आपण देऊ. कोकणातील तरुण नोकरीसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात न जाता इथे राहिला पाहिजे. इथल्या मातीत व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा झाला पाहिजे, यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. इथे ‘पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग’ उभे राहिले पाहिजेत, तुम्ही पुढाकार घ्या. याकरिता मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७८व्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी दरेकर म्हणाले, की महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये कोकणात उत्तम पद्धतीचा सहकार उभा राहील, याची ग्वाही देतो. संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठेपण गाजवण्यापेक्षा लोकांसाठी काय करता येईल? त्यांना प्रशिक्षित कसं करता येईल, याचा विचार सुभाषरावांसारखा नेता याठिकाणी करू शकतो, याचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे.
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सहकाराची नवी पिढी तयार केली. त्यांनी सहकारात शिस्त लावली. तळागाळातील ग्रामीण भागातील कार्यकर्ता सहकाराच्या माध्यमातून पुढे आणला. तरुणांना रोजगार दिला. शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले आहे, असे सांगताना वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीची माहिती दिली. कोकणासाठी सहकार प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे, अशी अपेक्षा आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे व्यक्त केली. मुंबई बँकेचे उपाध्यक्ष जिजाबा पवार यांनीदेखील आपले मनोगत मांडले.
सहकार कार्यशाळांप्रसंगी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा विकास अधिकारी अनिल कळंद्रे यांनी चिपळूण नागरीच्या यशस्वी वाटचालीचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.
फोटो ओळ ः
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७८व्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर. सोबत मान्यवर.
rat७p२१.jpg-
२५N९००८४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.