Mon, March 20, 2023

वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Published on : 31 January 2023, 11:39 am
महाड, ता.३० (बातमीदार) : मुंबई गोवा महामार्गावर दासगाव येथे अज्ञात वाहनाची झडत बसल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता.३१) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
महाड तालुक्यातील वीर गावाचे रहिवासी असलेले सचिन दासगावगावकर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने पायी प्रवास करत होते. दासगाव ते वीर दरम्यान वाहनाची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.