Wed, March 29, 2023

गळफास घेत तरुणाची आत्महत्या
गळफास घेत तरुणाची आत्महत्या
Published on : 7 February 2023, 4:22 am
महाड (बातमीदार) : तालुक्यातील सोलमकोंड येथे २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज (ता. ७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याने मोबाईलवर स्टेटस ठेवत एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सतीश भरत पवार हा मूळ धामणे येथील रहिवासी असून सध्या तो सोलमकोंड येथे एका चाळीमध्ये राहत होता. एकतर्फी प्रेमातून दारूच्या नशेत त्याने चाळीमधील पत्र्याच्या शेडला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी त्याचा भाऊ आदेश पवार याने महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.