Thur, March 23, 2023

कंपनीतून कॉपर कॅप्सची चोरी
कंपनीतून कॉपर कॅप्सची चोरी
Published on : 5 March 2023, 11:03 am
महाड, ता. ५ (बातमीदार) : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीतून दोन हजार ४०० रुपये किमतीच्या १२ क्लोरीन टनर कॉपर कॅप्सची चोरी झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटकही केली आहे.
कॉपर कॅप्सूल चोरी झाल्याची घटना २६ फेब्रुवारीला घडली होती. याप्रकरणी रिशू शर्मा (वय ३४) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासाअंती पोलिसांनी गणेश सावंत (४८) आणि अजय शर्मा (२८) या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस हवालदार विनोद पवार अधिक तपास करत आहेत.