कंपनीतील अपघातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीतील अपघातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
कंपनीतील अपघातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

कंपनीतील अपघातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

sakal_logo
By

महाड, ता. २९ (बातमीदार) : तालुक्‍यातील हायकल लिमिटेड कारखान्यांमध्ये रिॲक्टरमधील रासायनिक उत्पादनाने पेट घेतल्याने तीन कामगार भाजून जखमी झाले होते. या घटनेला जबाबदार असल्याप्रकरणी कंपनीमधील चार अधिकाऱ्यांसह एका ठेकेदाराविरोधात महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायकल लिमिटेड या कारखान्यात एचएससी २५५ या रसायनाचे उत्पादन सुरू असताना रिॲक्टरचे झाकण उघडल्‍याने ज्‍वलनशील रसायनांनी पेट घेतला. आगीचे लोट बाहेर आल्‍याने ओमकार दिवेकर (२३), तुकाराम धनावडे (३५) व अनिलकुमार भारती (२२) हे तीन कामगार भाजून जखमी झाले.
रविवारी घडलेल्‍या या अपघातातील (२६ मार्च) जखमींना कंपनी प्रशासनाने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती सुधारत आहे. २६ मार्चला सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली होती. याप्रकरणी हलगर्जी आणि निष्काळजीमुळे केल्‍याचा ठपका ठेवत पोलिसांनी कंपनीमधील राजेश सालेकर, अनंत सोनावणे, सुधीर मगर व मनोज महाडिक यांच्यासह ठेकेदार अनंत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीमध्ये किरकोळ स्वरूपात आग लागली होती. ही आग त्वरित आटोक्यात आली. कामगारांवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कंपनी प्रशासन कामगारांवर लक्ष ठेवून असून त्यांना सर्व सहकार्य केले जात आहे.
- सतीश कवाडे, प्रकल्‍प प्रमुख, हायकल लिमिटेड