महाडमध्ये तरुणाकडे सापडला गांजा

महाडमध्ये तरुणाकडे सापडला गांजा

महाड, ता. १८ (बातमीदार) : महाड शहरानजीक असलेल्या दादली पूल झोपडपट्टी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाकडून दोन किलो गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत ४० हजार १०० रुपये असून, याप्रकरणी या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहरात शनिवारी (ता. १७) मध्यरात्री १.३० च्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना अल्पेश अरुण पवार याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला गांजा पोलिसांना सापडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर अमली पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार निकेत वार्डे यांनी तक्रार दाखल केली असून, अधिक तपास निरीक्षक मिलिंद खोपडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com