महाडमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक

महाडमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक

महाड, ता. ४ (बातमीदार) : लोकसभा निवडणूक तसेच येणाऱ्या विविध सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलिसांतर्फे बुधवारी (ता. ३) दंगल नियंत्रण पथकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रात्यक्षिक घेण्यात आली.
महाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी दोन तास आगामी येणारे सण-उत्सव गुडी पाडवा, हनुमान जयंती, रमजान ईद, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दंगा नियंत्रण पथकाने रंगीत तालीम केली. प्रात्यक्षिकामध्ये महाड शहर पोलिस ठाण्यातील १ निरीक्षक ,२ उपनिरीक्षक, १५ अंमलदार, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील १ उपनिरीक्षक, ४ अंमलदार, पोलादपूर पोलिस ठाण्यातील ५ अंमलदार, महाड तालुका पोलिस ठाण्यातील १ उपनिरीक्षक, ५ अंमलदार, प्रशिक्षक तसेच माणगाव मधील ३० अंमलदार असे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

महाड ः दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com