महाडमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण

महाडमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण

महाडमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण
जिल्हा प्रशासनाकडून दखल; अनावश्यक पाणीसाठे नष्ट करण्याच्या सूचना

महाड, ता. ११ (बातमीदार): महाड शहरामध्ये काही डेंग्यूचे रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेत महाड नगर परिषदेसह संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
महाड शहरातील काही खासगी रुग्णालयात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे त्यांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्वरित दखल घेत या रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णांच्या घरी जाऊन सुरू असलेल्या उपचाराविषयी माहिती व परिस्थिती जाणून घेतली. रुग्ण आढळल्याने नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह डेंग्यू संदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची चाचपणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
अनावश्यक पाणीसाठे नष्ट करून अन्य ठिकाणचे पाणीसाठेदेखील नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून नगर परिषदेमार्फत आवश्यक ती औषध फवारणी व धूर मारणे सुरू केले आहे. यावेळी नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग, तसेच महाड नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य विभाग अलिबागतर्फे अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी प्रशांत घरत, कीटक समारक, वैभव कदम, वैभव म्हात्रे, ग्रामीण रुग्णालय महाडचे आरोग्य सेवक उमाकांत सोमवंशी यांसह महाड नगर परिषदेचे आरोग्य विभागप्रमुख परेश साळवी, अक्षय साळवी आदी कर्मचारी उपस्थित होते.
....
फोटो - आरोग्य विभागाने नगरपालिकेत दिलेली भेट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com