तिथी व तारखेच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यांकरता एसटीच्या तीनशे बसेस आरक्षित

तिथी व तारखेच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यांकरता एसटीच्या तीनशे बसेस आरक्षित

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी एसटीच्या ३०० बस
प्रशासनाकडून सोयी-सुविधा उपलब्‍ध

महाड, ता. ४ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर सहा जूनला तारखेनुसार तर २० जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवप्रेमींसाठी एसटी महामंडळाच्या ३०० गाड्या जिल्‍हा प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या आहेत.
रायगडावर तारखेनुसार व तिथीनुसार असे दोन शिवराज्याभिषेक सोहळे साजरे केले जातात. सहा जूनला तारखेनुसार तर वीस जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी साजरा होणार आहे. रायगडावर साजरा होणाऱ्या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल होत असतात. या शिवप्रेमींची ये जा करण्यासाठी महाड एसटी आगाराकडून सोय केली जाते.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमी करता वाळसुरे, कोंझर तसेच कवळीचा माळ या ठिकाणी वाहनांकरता पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. रायगडच्या पायथ्याशी तसेच पाचाड घाटामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता सुविधा करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणांहून रायगड पायथा व रोपवे तसेच हेलीपॅड या ठिकाणांहून एसटी बस फेऱ्या नियोजित केल्‍या आहेत.

पाच व सहा जूनला दोनशे एसटीच्या गाड्या तर १९ व २० जून या दिवसाकरिता शंभर एसटी गाड्या प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामुळे शिवप्रेमींना रायगड किल्ल्यावर जाणे सुलभ होणार आहे. शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता महाड आगार व एसटी महामंडळ सज्ज आहे.
- शिवाजी जाधव, वाहतूक नियंत्रक, महाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com