नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक

महाड, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील ईसाने कांबळे गावात गोवंश हत्या व गोरक्षकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलेल्या वक्तव्याविरोधात महाडमधील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावात गोवंश हत्येचा प्रकार गोरक्षकांनी उघडकीस आणला होता. यावेळी गोरक्षकालाही मारहाण करण्यात आली तसेच पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला. तसेच मुस्लिम समाजाबाबत अपशब्‍द वापरले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने महाडचे पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांची भेट घेत राणेंवर कारवाईची मागणी केली व याबाबतचे लेखी निवेदन पोलिस प्रशासनाला दिले आहे. राणे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्‍याने त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाज जेलभरो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, त्याचप्रमाणे महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत पद्धतीने निवेदन देण्यात आले आहे. या वेळी मुस्लिम समाजाचे बशीर चिचकर, मुहम्मद अली पल्लवकर ,वजीर कोंडिवकर, महबूब कडवेकर, मंसूर देशमुख, मन्सूर ताज, अकबर तरे, अख्तर पठाण आदी उपस्थित होते.

महाडः मुस्लिम समाजाचे प्रतिनिधींनी उपअधीक्षक शंकर काळे यांना निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com