शिवछत्रपती चौकात सुशोभीकरणासाठी ७५ लाख
महाड, ता. १८ (बातमीदार) ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभित करण्याचे काम महाड नगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे. शिवजयंतीपूर्वी कामाला सुरुवात झाल्याने शिवप्रेमी व महाडकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महाड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिजामाता उद्यानाला लागूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा असून, भोवताली रेलिंग बसवण्यात आले होते. शिवजयंतीला अनेक नागरिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी येतात.
महाड नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहतूक बेट उभारले असून, मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अर्धकृती पुतळा व परिसर अनेक वर्षे सुशोभीकरणापासून दूर राहिला होता. आता नगरपालिकेने हा परिसर सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७५ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पूर्वी असणारा पुतळा तसाच ठेवून पुतळ्याच्या भोवताली अष्टकोनी चबुतरा बांधला जाणार आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस महाद्वार व बुरुजाची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. पुतळ्याच्या चारी बाजूंनी दगडी भिंत बांधली जाणार आहे. तसेच या ठिकाणी इतिहासकाळात असणाऱ्या देवडीसाठीही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाड नगरपालिकेकडून ७५ लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या पुतळ्याच्या ठिकाणी नव्याने सुशोभीकरण व बांधकाम केले जात आहे. महाद्वार, बुरुजांमुळे परिसराला ऐतिहासिक लूक येईल.
- प्रवीण कदम, नगर अभियंता, महाड नगरपालिका
महाड ः छत्रपती शिवरायांच्या जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

