महाडमधील एसटी वाहतूक बंद

महाडमधील एसटी वाहतूक बंद

Published on

महाड, ता. २५ (बातमीदार) : महाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिनोत्‍सव सुरू झाला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरातून होणारी एसटी महामंडळाच्या गाड्यांची वाहतूक मंगळवारपासून (ता.२५) ३ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. या काळात एसटी बससाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जाणार आहे.
छबिना उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढते. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटल्‍याने तसेच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्‍याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्‍या आहेत. महाड आगारातून मुंबई व माणगावकडे जाणाऱ्या गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दस्तुरी नाकामार्गे जातात. तसेच दापोली, मंडणगड, विन्हेरे खाडीपट्टा अशा ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक गाड्या वीरेश्वर मंदिरमार्गे जातात.
महाड शहरात येणाऱ्या महाड आगाराच्या ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मंदिर या ठिकाणी प्रवासी उतरवतात. या गाड्यांची शहरातून मोठी वाहतूक सुरू असल्याने छबिना उत्सवामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे महाड बस स्थानकातून येणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक महाड शहरातून बंद करण्यात आली आहे.

प्रवाशांची गैरसोय
मुंबई, पुणे, माणगाव, रोहा, श्रीवर्धन व त्या भागामध्ये प्रवास करणाऱ्या गाड्या एसटी स्थानकातून मुंबई-गोवा महामार्गाने थेट नाते खिंडमार्गे रवाना होतील तर दापोली, मंडणगड आदी भागात जाणाऱ्या ग्रामीण भागातील गाड्या राजेवाडी, शिरगावमार्गे रवाना होतील. एसटी गाड्यांचा मार्ग बदलल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक व श्री वीरेश्वर मंदिर या ठिकाणी चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांची काही दिवस गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com