जाखमाता पालखी-मिरवणुकीमुळे महाड भक्‍तिमय

जाखमाता पालखी-मिरवणुकीमुळे महाड भक्‍तिमय
Published on

महाड, ता. २६ (बातमीदार) : महाशिवरात्रीच्या दिवशी महाडची ग्रामदेवता जाखमाता देवीची वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली, त्‍यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
छबिना उत्सवानिमित्ताने बुधवारी वीरेश्वर महाराजांची लाडकी बहीण महाडची ग्रामदेवता जाखमातेच्या पालखीचे वाजतगाजत शहरात स्वागत करण्यात आले. या वेळी वीरेश्वर पंच समिती, सेवेकरी, तसेच ग्रामस्थ व भक्त देवीच्या पालखीसमोर पायघड्या घालतात. या पायघड्यांवरून पालखी नेण्याची पूर्वापार परंपरा आहे. पालखीसाठी पायघड्या टाकण्याची संधी यंदा अनेक भक्तांना मिळाली होती. नगारा, खालुबाजाच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली. या वेळी पालखीसमोर उंच सासनकाठ्या नाचवण्यात तरुणाई मग्न झाली होती.
महाड शहरातील विविध भागांचे आखाडेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर गावदेवीची ओटी भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास जाखमाता मंदिर येथून देवस्थानचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, उत्सव समिती अध्यक्ष रोहन पवार, माजी सरपंच दिलीप पार्टे, उत्सव समिती उपाध्यक्ष जितेश शेडगे, तसेच देवस्थानचे अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान करण्यात आले. बाजारपेठेतून निघालेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वीरेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या कोटेश्वर देवी मंदिरामध्ये छबिना उत्सव संपेपर्यंत जाखमाता देवीच्या पालखीचा मुक्काम असतो.

महाकालेश्‍वराच्या दर्शनासाठी गर्दी
महाड शहरातील सरेकर आळीमध्ये असलेल्या श्री महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित केले होते. अभिषेक करण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती.

महाड ः जाखमाता देवीची पालखी वाजतगाजत निघाली. या वेळी विविध आखाडे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com