घुरूपकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह

घुरूपकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह
Published on

घुरूपकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह
महाड, ता. २६ (बातमीदार) : महाड तालुक्यातील घुरूपकोंड येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदिरात मंगळवार, २५ ते गुरुवार २७ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ५३ वे वर्ष आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळी आठ वाजल्यापासून महादेवाच्‍या पिंडीला अभिषेक, घटस्थापना ज्ञानेश्वरी पूजन, दीपपूजन, ध्वजारोहण, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम पार पडले. गजानन पाटणे, योगेश भुवड, दत्ताराम पाटणे, सुरेश काप, विलास पाटणे, हभप हरिश्चंद्र सकपाळ, अशोक घुरूप, सुहास चिवीलकर, दौलती काप, गजानन काप, मारुती भुवड, किसन बाटे, संदीप वाजे या वेळी उपस्थित होते. तर बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी काकड आरती, दिंडी सोहळा, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम पार पडले. गुरुवारी सकाळी पहाटे काकड आरती, हभप गजाननबुवा काप व ग्रामस्थ मंडळ घुरूपकोंड यांचे काल्याचे कीर्तन, हभप प्रवीण महाराज सकपाळ, तुर्भे यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी महाप्रसाद, श्री सत्यनारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांनी या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सोहळ्यादरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक व अन्नदाते, देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला. तर महाड गटाच्या महिला अध्यक्षा मयूरी भुवड यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, मानाई महिला मंडळ, तरुण मित्रमंडळ, ग्रामविकास मंडळ घुरूपकोंड यांनी परिश्रम घेतले.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com