चवदार तळ्यात पडल्याने एकाचा मृत्यू

चवदार तळ्यात पडल्याने एकाचा मृत्यू
Published on

चवदार तळ्यात पडल्याने एकाचा मृत्यू
महाड, ता. ४ (बातमीदार) : ऐतिहासिक चवदार तळ्यात पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सतीश कुरणकर (वय ५१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३) सतीश कुरणकर हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडईच्या मार्गावरून चवदार तळ्याकडे आले. तळ्याच्या कठड्याला टेकून उभे असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते तळ्यात पडले. तळ्यातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची महाड शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष जाधव पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com