बिहारमधील फरार नक्षलवाद्याला महाडमध्ये अटक

बिहारमधील फरार नक्षलवाद्याला महाडमध्ये अटक
Published on

बिहारमधील फरार नक्षलवाद्याला महाडमध्ये अटक

महाड, ता. २८ (बातमीदार) : बिहार पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याला महाड औद्योगिक क्षेत्रातील देशमुख कांबळे या गावातून अटक करण्यात आली. बिहार स्पेशल टास्क फोर्स व महाड औद्योगिक पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री ही कारवाई केली.
बिहार सरकारकडून गुन्हेगार व नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी बिहारमध्ये गुन्हा करून फरार झालेल्या जहाल नक्षलवाद्यास बिहार राज्य पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स व महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिस पथकाने पकडल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा जहाल नक्षलवादी बिहार पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीमध्ये आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा व यूएपीए गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात अधिकृतपणे माहिती बिहार सरकारकडून देण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com