

अमित शहा आज रायगडावर
शिवसमाधी जीर्णोद्धाराची शताब्दी
महाड, ता. ११ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५वी पुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धाराच्या शताब्दीनिमित्ताने रायगडावर १२ एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गासह किल्ले रायगड आणि परिसरात सुरक्षा व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने गडावर विविध कार्यक्रमदेखील होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून अनेक मंत्री, खासदार आणि आमदारदेखील हजर राहणार आहेत. रायगडावर सकाळी पाच वाजता श्री जगदीश्वर पूजा व सहा वाजता हनुमान जयंती उत्सव यांनी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर शिवसमाधीचे पूजन केले जाणार आहे. राजदरबारात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. सत्कार, बक्षीस वितरण आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर शिवराय मुद्रा स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. शिवछत्रपतींना रायगड पोलिसांकडून मानवंदना दिली जाणार आहे. अमित शहा व इतर मंत्र्यांसाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे तात्पुरते चार हेलिपॅड बनवले आहेत. दोन किलोमीटर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅगग्लायडर्स इत्यादींच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर १२ एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.