राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तनय लाडाची सुवर्ण
महाड, ता. १३ (बातमीदार) : महाडचा रहिवासी आणि सध्या पनवेलच्या न्यू हॉरिझॉन पब्लिक स्कूलमध्ये शिकणारा १२ वर्षीय तनय लाड याने शनिवारी (ता.१२) केरळमध्ये कोची येथे आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले. सहा किलोमीटर अंतर त्याने एक तास २९ मिनिटे ५४ सेकंदात पूर्ण प्रथम क्रमांक पटकावला.
तनयने गतवर्षी याच स्पर्धेत १.३३.०९ वेळेत १२ वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला होता. ही स्पर्धा पेरियार नदीच्या अलुवा शहरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातील अनेक युवा जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तनय हा रूपाली रेपाळे जलतरण अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतो. ही संस्था ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर, पालावा, डोंबिवली येथे आहे. त्याला रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांसारख्या अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. काही दिवसांपूर्वी तनयने गेटवे ते अटलसेतू हे १७ किलोमीटर सागरी मैलाचे अंतर २ तास २६ मिनिटांत पोहून विक्रम नोंदविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

