महाडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग
महाडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग
महाड, ता. १५ (बातमीदार) : विनयभंगप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन शाळकरी अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) शहरामध्ये घडली. याप्रकरणी महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार रजनीकांत रणदिवे (वय २७) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. १४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महाड शहरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधील एका केबिनमध्ये दोन अल्पवयीन मुली आपली शिकवणी संपवून काही कामानिमित्त गेल्या असता आरोपीने या केबिममध्ये घुसून या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केले. या घटनेची माहिती या मुलींनी नातेवाइकांना दिली असता त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी ओंकारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

