महाडमध्ये आज दिव्यांगांसाठी मार्गदर्शन मेळावा

महाडमध्ये आज दिव्यांगांसाठी मार्गदर्शन मेळावा
Published on

महाड, ता. २४ (बातमीदार) : महाड व पोलादपूर तालुक्यातील दिव्यांगांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. २५)चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जूक यांनी मेळाव्याबाबत माहिती दिली.
बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सवलती व त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. महाड तालुक्यात अडीच हजारांपेक्षा अधिक दिव्यांग बांधव आहेत, परंतु अद्याप बरेच दिव्यांग बांधव विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी १० वाजता दिव्यांग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय अन्न सुरक्षा योजना, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच जिल्हा परिषदेंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांबाबत अर्ज भरणे, मार्गदर्शन व साह्य करण्यात येणार आहे. मेळाव्याला महाड, पोलादपूर तालुक्यातील दिव्यांंगांनी आवर्जून उपस्थित राहून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाड-पोलादपूर अध्यक्ष फैज उमर हुर्जूक यांनी केले आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com