आता मार्गस्थ एसटीचे ठिकाण समजणार
महाड, ता. ३ (बातमीदार) : एसटीची वाट पाहात अनेकदा ताटकळत उभे असतात. बस कधी सुटेल, स्थानकावर कधी येईल, याचा काहीच अंदाज नसल्याने प्रवासी संभ्रमात पडतात, परंतु आता प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणेच आता एसटीचेही लोकेशन प्रवाशांना कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.
रेल्वे प्रवाशांना गाडी कोणत्या स्थानकात किती वाजता येणार आहे, याची अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रवाशांना नियोजन करणे सोपे जाते. एसटीच्या लोकेशनची अशी कोणती माहिती नसल्याने प्रवासी अक्षरशः ताटकळत असतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो.
आता प्रवाशांना राज्य परिवहन सेवा (एसटी) बसचे लोकेशन त्यांच्या मोबाईलवर कळेल. एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपद्वारे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर लालपरीचे लोकेशन मिळणार आहे. एसटी तिकिटावर चिन्हांकित केलेल्या क्रमांकावरून बसस्थानकावर बस येण्याची वेळ कळू शकणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रवासाचे मूळ साधन म्हणून एसटी आहे, परंतु चालकांची कमतरता, बसची मर्यादित संख्या व वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला लागणारा वेळ यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडत असते, परंतु आता एसटी ताफ्यातील सर्व वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज असल्याने, एसटी अॅपवर बसची माहिती उपलब्ध होईल.
राज्यभरात पन्नास हजार मार्गांवर सव्वा लाख एसटी फेऱ्या आहेत. या सर्वांना याचा फायदा होणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसचे नेमके स्थान किंवा एसटी मध्यवर्ती थांब्यावर कधी पोहोचणार हे कळू शकत नाही. यासाठी महामंडळाने विकसित केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने, बसचे थांबण्याचे ठिकाण आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकावर येण्याची अपेक्षित वेळ आधीच कळेल. येत्या १५ ऑगस्टपासून ॲप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. राज्यातील १४,५०० बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.