लेहमध्ये अडकलेले महाडचे पर्यटक सुखरूप
लेहमध्ये अडकलेले महाडचे पर्यटक सुखरूप
महाड, ता. ९ (बातमीदार) : लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने अडकून पडलेल्या महाडमधील नऊ पर्यटकांची आता सुखरूप आहेत. मार्गावरील दरड काढण्यात आल्याने येथे अडकलेले पर्यटक व वाहनचालक मार्गस्थ झाले आहेत.
लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता. ८) दरड कोसळल्याने अनेक प्रवासी मार्गाच्या दोन्ही बाजूला अडकून पडले होते. अनेक प्रवासी व वाहन चालक रस्त्यात अडकून पडले होते. यामध्ये महाड मधील नऊ पर्यटकांचा समावेश होता. महाड शहरातील अमोल महामुणकर, समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असे एकूण नऊ जण लेह-लडाखच्या सहलीसाठी गेले आहेत. या ठिकाणाहून परतीचा प्रवास करत असताना रस्त्यावर दरड कोसळल्याने हे सर्वजण अडकून पडले. दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने या सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या ठिकाणी असलेले अत्यंत प्रतिकूल वातावरण व त्यातच २ डिग्री सेल्सिअसपर्यंत असणारे खाली घसरलेले तापमान यामुळे हे सर्वजण कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी मेटाकुटीला आले.
अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव असल्याने येथे अडकून पडलेल्या अनेक प्रवासी, पर्यटक व वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे मार्ग मोकळा होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे प्रशासनाकडून मदत मिळावी याची मागणी महाडमधील पर्यटकांनी सोशल मीडियावर केलेली होती. परंतु यानंतर या पर्यटकांचे दूरध्वनी बंद झाल्याने संपर्क होणेही कठीण होऊन बसले होते. महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी देखील या सर्व पर्यटकांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्यांच्या नातेवाइकांकडे देखील याबाबत संपर्क साधला होता. परंतु सकाळी साडेअकराच्या दरम्यान हे सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. दरम्यान प्रशासनाकडून या ठिकाणची दरड हटविल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली त्यामुळे येथे अडकलेले माणसे पर्यटक आपल्या परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले आहेत.
....
फोटो - महाड मधील पर्यटक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.