छत्री निजामपूर ग्रामपंचायत होणार किल्ले रायगड
छत्री निजामपूर ग्रामपंचायत होणार किल्ले रायगड
ग्रुप ग्रामपंचायतीचा नामांतराचा ठराव एकमताने मंजूर
महाड, ता. १४ (बातमीदार) ः रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामांतर किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत असे करण्याबाबतचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामसभेने नामांतरास एक मताने मंजुरी दिल्याने छत्री निजामपूर ग्रामपंचायतीच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडला भेट दिली. त्यानंतर रायगड आणि मुंबईत माध्यमांशी बोलताचा रायगडच्या पायथ्याला निजाम आला कुठे, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामांतर किल्ले रायगड ग्रामपंचायत करावे आणि कार्यालय रायगडवाडी येथे हलविण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. केवळ ही भूमिका मांडूनच ते थांबले नाहीत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदनही त्यांना दिले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या या भूमिकेचे समर्थन करत ११ जुलै रोजी छत्री निजामपूर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगडवाडी येथील ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. या सभेत नामांतराच्या मुद्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रभाकर सावंत यांनी छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामांतर किल्ले रायगड ग्रूप ग्रामपंचायत करण्यात यावे, असा ठराव मांडला. या ठरावाला राकेश गायकवाड, अजित अवकिरकर, गणेश मोरे, प्रभाकर मोरे आणि लहू अवकिरकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मंजुरी देत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
.........
गावाचे नाव मात्र कायम राहणार
ग्रामपंचायतीचे नामांतर करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली असली, तरी गावाचे नाव बदलण्यात येऊ नये, असा आग्रह या ग्रामसभेत धरण्यात आला आहे. गावाचे नाव छत्री निजामपूर असेच राहावे असाही ठराव करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराबरोबरच या ग्रामपंचायतीचे कार्यालय रायगडवाडी येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली होती, मात्र नामांतर झाले तरी ग्रामपंचायत कार्यालय स्थलंतरित करू नये, ते छत्री निजामपूर येथेच राहावे अशी भूमिकादेखील ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या नामांतरास विशेष ग्रामसभेने मंजुरी दिल्यामुळे किल्ले रायगड ग्रूप ग्रामपंचायत असे नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.