महाडमध्ये महिलांसाठी ४२ ग्रामपंचायती आरक्षित

महाडमध्ये महिलांसाठी ४२ ग्रामपंचायती आरक्षित

Published on

महाड, ता. १६ (बातमीदार) : महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मंगळवारी (ता. १५) तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले.
आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी रानवडी खुर्द, सवाणे व वलंग तर खुल्या गटासाठी चिंभावे मोहल्ला, रेवतळे व लाडवलीचा समावेश आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरिता सोनघर, कसबे शिवथर, आंबे शिवथर व कुंभे शिवथर ग्रामपंचायती तर खुल्या वर्गासाठी मुमुर्शी, कोळोसे, निजामपूर, करंजाडी व नरवण या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी एकूण ४२ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत तर मागास प्रवर्गामध्ये १८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com