रासायनिक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

रासायनिक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

Published on

महाड, ता.३१(बातमीदार): औद्योगिक क्षेत्रातील सविती केमिकल कारखान्याविरोधात रासायनिक पाणी नदीपात्रात विसर्ग केल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवला आहे.
औद्योगिक क्षेत्रामध्ये तसेच नदीपात्रात रासायनिक पाणी सोडण्याचा उद्योग काही कंपन्या करीत होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याचा सुगावा लागत नव्हता. महाड एमआयडीसी पोलिसांनी पाळत ठेवून आसनपोई गावच्या हद्दीतील सविती केमिकल्स कंपनी नदीपात्रात रसायनमिश्रीत पाणी सोडण्याचा प्रकार कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे प्रदुषणकारी कंपन्या महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या रडारवर आल्या आहेत. पावसामुळे सावित्री नदीत मिसळून सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले होते. पावसाचे निमित्त साधत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडत असल्याच्या नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
------------------------------------------------
सुरक्षा साधनांचा अभाव
महाड एमआयडीसी पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने महाड औद्योगिक क्षेत्रातील आसनपोई गावच्या हद्दीमध्ये डी झोन प्लॉट नंबर.१४ येथे छापा टाकला. यावेळी कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करणारी कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. तसेच अग्निरोधक उपकरणे नसल्याने मानवी जिवाला धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवत संजय धुमाळ (वय ६०). रा. कोथरूड पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com