निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या
निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या
कृषी महाविद्यालयासह पालिकेचा उपक्रम
महाड, ता. २६ (बातमीदार) : गौरी-गणेशमूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्यही फेकून दिले जाते. यामुळे नद्या व तलावातील पाणी खराब होत असते. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर निर्माल्याचे काय करायचे, हा प्रश्न सर्वांपुढे असतो, परंतु ही चिंता आता दूर झाली असून, यासाठी आचळोली येथील कृषी महाविद्यालय आणि महाड नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. निर्माल्य द्या आणि कंपोस्ट खत घ्या, असा अभिनव उपक्रम राबवून निर्माल्याचा प्रश्न सोडवला आहे.
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करताना आपण पान, फुले, फळे, पत्री त्याच्या चरणी अर्पण करत असतो. श्रद्धेने वाहिली जाणारी ही पूजा सामग्री गणेश विसर्जनानंतर निर्माल्य होते आणि हे निर्माल्य कचरा कुंडीत नाहीतर नदीत फेकून दिले जाते, परंतु आता निर्माल्य फेकून न देता ते एकत्र करून ठेवा आणि सक्रांतीच्या दिवशी आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रीय खत घेऊन जा, असा हा वेगळा उपक्रम कृषी महाविद्यालय व महाड नगरपालिकेने राबवला आहे.
परमेश्वरचरणी वाहिले जाणारे हे निर्माल्य पुन्हा निसर्गामध्येच एकरूप व्हावे या संकल्पनेतून उत्सव काळात घरात निघणारे निर्माल्य गणेशभक्तांनी फेकून न देता संकलित करावे, असे
जमा केलेल्या निर्माल्याचे उत्कृष्ट सेंद्रीय (कंपोस्ट) खत कृषी महाविद्यालयामध्ये तयार केले जाते. यासाठी कृषी महाविद्यालयाने कंपोस्ट खतनिर्मिती यंत्रणादेखील तयार केली आहे. १४ जानेवारी २०२६ ला संक्रांतीला तीळगूळ देण्यासाठी येणाऱ्यांना हे कंपोस्ट खत भेट म्हणून दिले जाणार आहे. घराच्या बाल्कनी, टेरेसवरील कुंड्या किंवा अंगणातील झाडांना हे सेंद्रीय खत टाकून निसर्गदेवतेचेही स्मरण केले जावे. यासाठी गणेशभक्तांनी निर्माल्य संकलनात सहयोग द्यावा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्नित आचळोतील कृषी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
....................
निर्माल्य संकलित करण्यासाठी आचळोली, रायगड रोड, महाड येथील कृषी महाविद्यालयचे कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाअंतर्गत विशेष संकलन केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कचरा निर्मूलन, कचरा विलगीकरणाची सवय लागणे आणि आपल्याच घरातील कुंडीत फळभाजी, पालेभाजी पिकविण्याचा आनंद नागरिकांना मिळावा, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. निर्माल्याचे उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होण्यास तीन ते चार महिने लागतात. ते श्रीगणेशभक्तांना मोफत वाटण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी श्रीगणेशभक्तांनी प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर 83907 17365 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. शेकडो कुटुंब या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयशी जोडली गेली आहेत.
....
लोक निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक होत असून, कृषी महाविद्यालयाच्या विधायक आणि रचनात्मक उपक्रमाला महाडकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. निर्माल्यापासून तयार केलेले कंपोस्ट खत रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. या उपक्रमात गणेशभक्त व मंडळांनी सहभागी व्हावे, असे डॉ. वैभव गिम्हवणेकर (प्राचार्य, कृषी महाविद्यालय, आचळोली) यांनी सांगितले.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.