११३ वर्षांची परंपरा जपणारे गोमुखी आळी मंडळ

११३ वर्षांची परंपरा जपणारे गोमुखी आळी मंडळ

Published on

टिळक, सावरकरांच्या विचारांने प्रेरीत होऊन गणेशोत्सव
११३ वर्षांची परंपरा जपणारे गोमुखी आळी मंडळ
महाड, ता. ३१ (बातमीदार) : गणेशोत्सवाला बाजारू स्वरुप न देता लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या समाजप्रबोधनाच्या मूळ हेतूला कुठेही बाधा न आणता अत्यंत साध्या पद्धतीने सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची परंपरा महाडच्या गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ११३ वर्षानंतर आजही कायम जपली आहे.
लोकमान्य टिळकांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या त्यावेळच्या अनेक तरुणांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला. टिळक व सावरकरांच्या विचारांने प्रेरीत असलेल्या कै. रामचंद्र धर्माजी जाधव व त्यांचे ब्राह्मण मित्र यांनी एकत्र येत १९१३ रोजी हा उत्सव सुरू केला. जाधव यांचा गणेशमूर्तीचा कारखाना होता. तुम्ही जागा बघा मी मूर्ती देतो, असे त्यांनी सांगताच सर्वांना प्रेरणा मिळाली आणि गोमुखी आळीतील वीरकर मंडपात महाडमधील हिंदू महासभेचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. नेमकेच पण उपयुक्त सजावट व देखावे मंडळाकडून तयार केले जातात. पुर्वी बैलगाडीचा गाडा उभा करून त्याला चादरी लावून सजावट केली जात. तो काळ स्वातंत्र्यपूर्व असल्याने राष्ट्रभक्ती, चळवळी यावर आधारीत कार्यक्रम केले जात. आजही येथे डिजे व मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात नाहीत. गोमुखी आळीतील गणेशोत्सव व नाटके यांचे नाते घट्ट. सामाजिक व ऐतिहासिक दोन व तीन अंकी अनेक नाटक आळीतील कलाकारच सादर करत असतात. पुढे चंद्रकांत व सुर्यकांत मुठल या पितापुत्रांनी नाटकाची परंपरा कायम ठेवली. संगीत कार्यक्रम, व्याख्याने, प्रश्नमंजुषा, मुलांचे गुणदर्शन कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम अशा कार्यक्रमांसह रक्तदान शिबिरे, गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असे सामाजिक दायीत्व मंडळ पार पाडत असते.
..........................
साधे व सुंदर देखावे
यावर्षी महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहितीचा देखावा मंडळाने साकारलेला आहे. गीत गायन व व्याख्यानांचा कार्यक्रम देखील आहे. यापूर्वी मंडळाने तुळशी वृंदावनाचा देखावा, ज्ञानेश्वरांची भिंत, व्यसनमुक्ती, सोन्याचा नांगर, दीपस्तंभ, कृष्ण सारथ्य, फिरत्या चाकांचा रथ, नारळातील गणपती, धरणाचे फायदे, पर्यावरणरक्षण, लोकमान्यांवरील देखावा असे अनेक देखावे तयार केले आहेत. ११३ वर्षानंतर उत्सवाची ही परंपरा नवी पिढी देखील तितक्याच उत्साहात पार पाडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com