लाडक्या गणरायाला महाडमध्ये निरोप
लाडक्या गणरायाला महाडमध्ये निरोप
महाड, ता. ३ (बातमीदार) : गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आणि गौराईला महाडमध्ये मंगळवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला.
महाड शहरातील गणेशमूर्तींचे सावित्री नदीमध्ये तसेच नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले गणेशोत्सवाच्या या सात दिवसांमध्ये संपूर्ण महाड शहर भक्तिमय झाले होते. मंगळवार सकाळपासूनच गणरायाच्या निरोपाची तयारी सुरू झाली. विविध गाणी, भजन आणि आरतीने परिसर दुमदुमला होता. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. महाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक-सहा, तर खासगी-एक हजार ३६५ गणेशमूर्तींचे आणि एक हजार ३६१ गौरींचे विसर्जन करण्यात आले. महाड तालुका पोलिस ठाण्यामध्ये ग्रामीण भागातील सार्वजनिक-५, खासगी- एक हजार २२२ गणेशमूर्ती, तर २१० गौरीचे विसर्जन करण्यात आले. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक १०, खासगी-८२० व २३० गौरींचे विसर्जन करण्यात आले. महाड शहरामध्ये भोयी घाट, गवळ आळी, घाट जाकमता घाट, दादली पूला जवळील घाट, मिल्ट्री हॉस्टेल जवळ तसेच नवेनगर भागांसह सावित्री नदीत गणेश विसर्जन करण्यात आले. घाटांवर आरती करून गणरायांना निरोप देण्यात आला व त्यानंतर होडीतून गणेशाचे विसर्जन करण्यात आले. महाड नगरपालिकेकडून दोन ठिकाणी कृत्रिम तलावाची सुविधा करण्यात आली होती. या ठिकाणी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात विसर्जन केले. नगरपालिकेकडून विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्याकरिता कलश तसेच हॅलोजनची सुविधा करण्यात आलेली होती. ढोल-ताशा तसेच खालूबाजाच्या गजरात महाड बाजारपेठेतून गणेशमूर्तींची मिरवणूकदेखील काढण्यात आली.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.