ब्रिटिशांविरोधातील शौर्याला अभिवादन
महाड, ता. ९ (बातमीदार) : देशामध्ये स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला असताना महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वात १० सप्टेंबर १९४२ मध्ये ब्रिटिश राजसत्तेविरोधात ‘चले जाव’ आंदोलन करण्यात आले होते. या वेळी काढलेल्या मोर्चावर इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या लढ्यातील आठवणींना गेली ८३ वर्षे महाडकरांकडून उजाळा दिला जात आहे.
१० सप्टेंबर १९४२ ला क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली महाड तहसील कचेरीवर निघालेल्या किसान मोर्चावर शहरातील पिंपळपार येथे तत्कालीन इंग्रज शासनाने अंदाधुंद गोळीबार केला होता. यात वसंत दाते, कमलाकर दांडेकर, विठ्ठल बिरवाडकर, अर्जुन भोई, नथू टेकावले यांना वीरमरण आले होते. या पंचवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीमार्फत महाड नगर परिषद व रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे.
---------------------------------------
कार्यक्रमाची रूपरेषा
महाड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक चार येथे बुधवार (ता. १०) सकाळी ८.३० वाजता हुतात्म्यांना मंत्री भरत गोगावले, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत यांच्यासह प्रांताधिकारी पोपट ओमासे, पोलिस उपअधीक्षक शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, महाड शहर पोलिस निरीक्षक संतोष जाधव, महाड गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांच्या हस्ते अभिवादन केले जाणार आहे. अभिवादन केल्यानंतर शहराच्या विविध चौकात असलेल्या नामफलकांना हार अर्पण करून यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे दाखल होणार आहे.
----------------------------------------
हुतात्म्यांच्या वंशजांचा सहभाग
या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन काही वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीमार्फत हा इतिहास पुढील पिढीपर्यंत प्रेरित रहावा, या उद्देशाने वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धाही घेण्यात येते. यातील प्रमुख तीन विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महाड नगर परिषदेमार्फत हुतात्मा स्मारक परिसरात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला विविध भागांतून हुतात्म्यांचे वंशज सहभागी होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.