गडदुर्गाची प्रतिकृती सेल्फीसह अपलोड करा, अमृतचा उपक्रम

गडदुर्गाची प्रतिकृती सेल्फीसह अपलोड करा, अमृतचा उपक्रम

Published on

गडदुर्गाच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी अपलोड करा
अमृतचा उपक्रम
महाड, ता. १४ (बातमीदार) : दिवाळी सणामध्ये फराळ, फटाके यांबरोबरच मातीचे किल्ले बनवण्यात बच्चेकंपनी रमून जाते. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनिनी म्हणजेच अमृतने दुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रत्येक नागरिकाने गडदुर्ग बनवून सेल्फीसह अपलोड करून छत्रपतींना अनोखी मानवंदना द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
छत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ गडदुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यानिमित्त नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीत, हाउसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये १२ दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि त्यासोबतचा सेल्फी अमृतच्या http://www.durgotsav.com या संकेतस्थळावर पाठवावा. दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांच्या छायाचित्रांचे संकलन केले जाईल. सहभागींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र पाठविण्यात येईल. तसेच अमृत विद्या या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मवर छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासावर आधारित ९९९ रुपयांचे प्रशिक्षण निःशुल्क उपलब्ध करून दिले जाईल.

‘अशी’ आहे स्पर्धा
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या १२ गडदुर्गांपैकी कोणताही एक बनवावा. गडदुर्गाचा आकार किमान दोन फूट असावा, सेल्फीमध्ये गडदुर्गाचा जास्तीत जास्त भाग दिसावा, असे आयोजकांकडून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com