महाडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये राडा

महाडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये राडा

Published on

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस वाद
महाडमध्ये दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
महाड, ता. २ (बातमीदार) : महाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या वेळी दोन्ही समर्थक एकमेकांना भिडले. त्यात काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हाणामारीमध्ये सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी, तर विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे यांना मारहाण केली. यात समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड झाली आहे. त्यामुळे महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सध्या महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

एकमेकांवर कुरघोडी
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. या वादातून दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. याचा उद्रेक आज मतदानावेळी पाहायला मिळाला. महाड शहरातील अप्सरा हॉटेलजवळ नवे नगर परिसर ही हाणामारी झाली. या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनचे मतदान केंद्र असून, मतदान प्रक्रिया सुरू होती. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे या ठिकाणी पाहणीसाठी आले होते. सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ईव्हीएम यंत्र बंद
अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडली होती. त्यामुळे गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थक एका मतदान केंद्रांवर जमले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हाणामारी सुरू झाली. गोगावले समर्थकांनी दगडफेक करून सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे हा वाद चिघळला. विकास गोगावले यांनी जप्त केलेले हे रिव्हॉल्व्हर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील पतास पोलिस करीत आहेत.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com